भजन गायन स्पर्धेची उत्साहात सांगता.
110 स्पर्धकांचा सहभाग
36 स्पर्धक बक्षिसांचे मानकरी
औसा प्रतिनिधी
दिं 8 एप्रिल. 2024
माऊली प्रतिष्ठान आणि माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने औसा येथे श्री मुक्तेश्वर मंदिरात शनिवारी आणि रविवारी राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या दोन दिवसात बाल गटातील आणि खुल्या गटातील एकूण 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यातील 36 स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सृष्टी नारंगवाडे, अथर्व घाडगे, कौशल्य पवार, यशराज राठोड, स्वरूप घाडगे, पार्थ इंजे, पदमराज जाधव, शिवप्रसाद गिरी, राजलक्ष्मी खुब्बा, रितेश कदम, सक्षम कांबळे, स्वराली भोजराज, ज्ञानेश्वरी चव्हाण, सांभवी भिसे या बाल गटातील 14 विजेत्यासह खुल्या गटातील 22 विजेत्यानी बक्षिसांचा मान मिळवला,
यावेळी पंडित शिव रूद्र स्वामी, अँडव्होकेट. मुक्तेश्वर वागदरे, हणमंत लोकरे, गजेंद्र जाधव, नरसिंग राजे, उमाकांत मुरगे, नागनाथ पाटील, संतोष तंत्रे पाटील, प्राध्यापक युवराज हालकुडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
लोकाधिकार न्यूजचे संपादक व्यंकटराव पणाळे, शरद जाधव किणीकर, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, पत्रकार रामभाऊ कांबळे, श्रीमंत पांचाळ, अविनाश यादव, खंडू क्षीरसागर, ओमकार चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
0 टिप्पण्या