औसा शिक्षक पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.
71 रक्तदात्यांनी केले रक्तदान
औसा प्रतिनिधी.
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 48 वा वर्धापन दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे* औचित्य साधून औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते.त्या अनुषंगाने दिनांक 13 एप्रिल 2024 शनिवार रोजी औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालय येथे सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरांचे शुभारंभ औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे,नायब तहसीलदार इंद्रजित गरड, पोलिस निरीक्षक प्रशांत लोंढे, प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना फुटाने, दिपक क्षीरसागर,औसा केंद्रीय मुख्याध्यापक नुरसाब शेख,पतसंस्थेचे सचिव संजय जगताप, व्हाय चेअरमन हरीश आयतनबोने यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा जोतिबा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी म्हणाले शिक्षक पतसंस्था किती शिक्षकाची काळजी घेते आपण स्वतःच्या लेकराची जशी काळजी घेते तशी काळजी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात. आपण पवित्र क्षेत्रामध्ये काम करतो दान सत्पर्य असावे असे म्हटले जाते ज्याला दान ची गरज आहे त्यालाच दान दिले जावे.तुमच्याकडे येणारा विद्यार्थी हा चिखलाचा गोळा असतो त्या कुंभाराकडून आकार देऊन त्याला मातीचा घडविला जातो तसा तो घडवित असतो ते म्हणजे योग्यदान आहे तसेच रक्तदान सुध्दा योग्य दान आहे.कुणालाही आपण रक्त देतो ज्याला रक्ताची गरज आहे अशा गरजूंना रक्त म्हणून ज्यांना गरज आहे त्यांना देतो.लोक अन्नदान करतात हजारोच्या पंगती जेवायला घालतात ज्याला गरज नाही त्याला बळंन वाढतात निम्मं खातात आणि निम्मं नाश करुन टाकतात हे दान होऊ शकत नाही पण आपण खरच ख-या अर्थाने सत्पर्य दान करत आहेत तसेच रक्तदान सुध्दा योग्य दान आहे असे रक्तदान शिबिरात बोलत होते.यावेळीआलेल्या मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.या रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.या शिबिराला चांगला असा प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणत्र देण्यात आले. रक्तदान शिबिराला इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा लातूर संचलित डॉक्टर भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर यांच्या टिमने या शिबिराला सहकार्य केले.या शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी औसा तालुका शिक्षक पतसंस्थेचे युसुफ पिरजादे सर, रमेश जाधव सर , धीरजकुमार रूकमे सर ,मधुकर गोरे सर , महेश कांबळे सर ,अमोल शेळके सर,दिपक डोंगरे सर, संजय रोडगे सर, श्रीमती मंदाकिनी माने मॅडम, श्रीमती संगीता काकडे मॅडम आदिनी परिश्रम घेतले.याप्रंसगी पतसंस्थेचे कर्मचारी व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित होते.
0 टिप्पण्या