*महात्मा ज्योतीबा फुले यांच्या 197 व्या होणाऱ्या जयंती निमित औसा शहरात भव्य रक्तदान शिबीर
.
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील माळी गल्ली येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या 197 व्या होणाऱ्या जयंती निमित्त रक्तदान, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावर आधारित स्पर्धा परीक्षा, गुणवंत व विविध क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 07/04/2024 रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस श्री अर्जुन पांढरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी शासकीय रक्त पिढीचे प्रमुख श्री चौधरी सर व त्यांच्या टीम चे स्वागत करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये विरनाथ माळी, वैभव वडगावे, अनिल म्हेत्रे, ज्ञानेश्वर फुटाणे, प्रदीप क्षिरसागर, किशोर माळी ,परमेश्वर माळी, विशाल माळी, दत्ता म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे , विकास माळी, पियुष म्हेत्रे, अजय फुटाणे , सौ. सुतार ,आशीर्वाद फुटाणे, आमरकांत माळी, सोमनाथ सुतार, गणेश माळी, निखिल माळी, केदार जोशी, अजय गाडेकर, माळी समाजाचे उपाध्यक्ष चांगदेव माळी तसेच लातूर येथून खास रक्तदान करणेसाठी माळी सेवा संघाचे राज्याध्यक्ष श्री पद्माकरजी वाघमारे, दापके सर व इतर 51 फुले प्रेमी यांनी रक्तदान केले. या रक्तदानामध्ये महिलांनी प्रथमच सहभाग नोंदविला. यासाठी शासकीय रक्त पिढी लातूर श्री चौधरी साहेब व त्यांच्या टीमने चांगले काम केले. या कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समिती -2024 चे अध्यक्ष पियुष म्हेत्रे, उपाध्यक्ष गोपाळ सूर्यवंशी, आकाश फुटाणे तसेच माळी समाजाचे अध्यक्ष सचिन माळी व इतर सर्व समिती महोत्सव पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशश्वी रित्या पार पाडला.
0 टिप्पण्या