फरीहाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याबद्दल त्याचे कौतुक करुन कुरेशी परीवारास आमदार अभिमन्यू पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

 फरीहाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केल्याबद्दल त्याचे कौतुक करुन कुरेशी परीवारास आमदार अभिमन्यू पवार यांनी शुभेच्छा दिल्या.




औसा प्रतिनिधी 


काळेवाडी पिंपरी पुणे येथील मुख्तार कुरेशी यांची नात फरीहा तौफिक कुरेशी या तीन वर्षांच्या मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिनांक 3 मार्च बुधवार रोजी माजी नगरसेवक मुख्तार कुरेशी व निसार कुरेशी यांना एक पत्र पाठवून परिवारास रमजान च्या शुभेच्छा दिल्या व त्या लहान मुलीने रोजा पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले.

त्याचे सविस्तर वृत्त असे 

इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र अशा रमजान महिण्यातील रोजे सुरु असून काळेवाडी पिंपरी पुणे येथील मुख्तार कुरेशी यांची नात फरीहा तौफीक कुरेशी हिने आपल्या आईकडे हट्ट धरुन या चिमुकलीने 14 तासाचा उपवास एक थेंब पाणी न घेता एक अन्नाचा कण न घेता पुर्ण केला या चिमुकलीचा सर्वत्र कौतुक होत आहे. तीन वर्षीय फरीहाने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.


या चिमुकलीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. फरीहा सह आपल्या सर्व कुरेशी परिवारास आमदार अभिमन्यू पवार  यांनी कौतुक करुन रमजानच्या शुभेच्छा  दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या