आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


 औस प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये औसा  शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या कलागुणाचे दर्शन घडविले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, युवा नेते धनंजय सावंत, शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, तानाजी सुरवसे, माजी नगरसेवक बंडू कोद्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व बालनायक टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची उपस्थिती होती. मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता उटगे मैदान मुक्तेश्वर रोड येथील भव्य दिव्य रंगमंचावर औसा शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. क्रांती नाना मळेगावकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कार्यक्रमातून खेळ पैठणीचा उपक्रम अतिशय स्तुत्य पणे राबवून दैनंदिन कामाच्या रहाटगाड्यातून महिलांना मनमोकळेपणाने आपल्या कलागुणाचे दर्शन घडविता यावे आणि त्या माध्यमातून विजेत्या महिलांना आकर्षक पक्ष बक्षिसांची लय लूट करता यावी या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. उटगे मैदानावर या कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातून हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या