पवित्र रमजान महिन्यामध्ये विविध समस्यांवर लक्ष द्यावे -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्यात विविध समस्यांवर लक्ष द्यावे अशी मागणी एम.आय.एम. च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. दि. १२/०३/२०२४ पासुन पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. औसा शहरातील प्रार्थनास्थळासमोरील बंद असलेले पथदिवे चालु करण्यात यावे व प्रत्येक गल्लीतील प्रार्थनास्थळी स्वच्छता असण्यासाठी रोजा सोडण्याच्या वेळसे सायंकाळी नगर पालिकेच्या वतीने घंटागाडीची वेगळी व्यवस्था करण्यात यावी जेणे करुन स्वच्छता राहण्यासाठी गरजेचे आहे. तसेच रमजान महिन्यामध्ये नळाला पाणी सोडताना उपास सोडण्याच्या वेळेस पाणी सोडण्यात येऊ नये व पाणी वेळेवर सोडण्यात यावे व बंद असलेल्या विंधन विहिरी चालु करण्यात यावेत व औसा शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्या पाईपलाईनवर बरेचश्या ठिकाणी वाल शेतकरी वॉलचे नट मोकळे करुन पाणी घेत आहेत. याचे आपणांला वारंवार सुचना करण्यात आलेली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाता आहे. त्याची व्यवस्था करण्यात यावी जेणे करुन शहराला वेळेवर पाणी पुरवठा होईल.
तरी वरील सर्व प्रश्नांकडे जातीने लक्ष घालुन सदरील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात.यामागणीसाठी आज दिनांक 11 मार्च 2024 सोमवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या