ऍड. जयराज जाधव यांना बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार.
औसा प्रतिनिधी
औसा येथील सामाजिक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते ऍड. जयराज पांडुरंग जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांनी घोषित केला. सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ऍड. जयराज जाधव यांना बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल सर्वश्री उद्धव लोंढे, राजेंद्र बनसोडे, अशोक बनसोडे, धम्मदीप डांगे, सामाजिक कार्यकर्ते जाधव कोपरे, राम कांबळे, वसंत टेकाळे, दत्तात्रेय सुरवसे, शेषराव गायकवाड, शरद बनसोडे, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या