आ. अभिमन्यू पवार यांचा औसा येथे भव्य नागरी सत्कार.
औसा/प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि विकासाभिमूक लोकप्रतिनिधी आ. अभिमन्यू पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून औसा शहरात विविध विकास कामांसाठी २०० कोटी पेक्षा अधिक रुपयाच्या निधी खेचून आणून औसा शहराचा कायापलट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. औसा शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, तक्षशिला सामाजिक प्रतिष्ठानचे भव्य दिव्य बुद्धविहार, सुसज्ज बसस्थानक, १४ ठिकाणी सुलभ शौचालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० खाटाचा दवाखाना यासह अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल क्षेत्रासाठी विकास निधी आणून औसा शहराच्या वैभवामध्ये भर घातली आहे. २०० कोटी
पेक्षा अधिक रुपयाचा विकास निधी आणल्यामुळे समस्त औसा वासियांच्या वतीने आ. अभिमन्यू पवार यांचा भव्य नागरि सत्कार करण्याचे आयोजित केले होते.त्यानिमित्ताने गांधी चौक औसा येथे आज दिनांक १५ मार्च २०२४ शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता समस्त औसा वासियांच्या वतीने आ.अभिमन्यू पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अभिमन्यू पवार म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे राजकीय गुरू आहेत.म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून औसेकरांनी विजयरुपी आशिर्वाद दिला आहे. सर्व समाजातील बांधवांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या विकासरुपाने सोडविण्यात यश आले असून केवळ चार वर्षांत फक्त शहरासाठी ४०० कोटी पेक्षा अधिक रुपयाचा निधी आणला आहे.यामुळे शहरातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन माझा सत्कार केला परंतु या विकास कामाचे खरे श्रेय माझ्या गुरुचे आहे.म्हणून औसेकरांनी केलेला हा भव्य विकासरुपी नागरी सत्कार देवेंद्र फडणवीसांना समर्पित करतो असे सत्कार प्रसंगी आ.अभिमन्यू पवार बोलत होते. याकार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष किरण
राजशेखर उटगे, शहराध्यक्ष सुनील उटगे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अॅड अरविंद कुलकर्णी, अँड मुक्तेश्वर वागदरे, कंठप्पा मुळे, सुशीलकुमार बाजपाई, माधवसिंह परिहार, दिगंबरराव माळी, संतोष चिकुर्डे कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड विरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.महमद हनीफ आलुरे यांच्यासह औसा शहरातील सर्व समाजातील नेते मंडळी उपस्थित होते .
0 टिप्पण्या