*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत* वानवडा जिल्हा परिषद शाळेचा *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे* कडून सत्कार
.
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत लातूर जिल्ह्यातील बक्षीस पात्र 35 शाळांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानवडा या शाळेचा औसा तालुक्यात *प्रथम* क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीचा शाल ,ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शोभा माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक मा.भारत सातपुते , प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मा. राजेंद्र सुर्वे, प्रमुख अतिथी आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा. शिवाजी वाघ, बहुजन समाज शि.संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. गौतम टाकळीकर, राज्य कार्याध्यक्ष मा.राजेंद्र सूरवसे , राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामकिशन सुरवसे ,मा.गुंडुरे सर,जिल्हाध्यक्ष मा. चंद्रशेखर शिरुरे, अण्णाराव नरसिंगे गोविंद कोलपुके ,महिला आघाडी रेखा सुडे , केंद्र प्रमुख मा.ज्योती स्वामी तथा जिल्ह्यातील बक्षीस पात्र शाळेतील मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते.
*टीप* मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत बक्षीसपात्र शाळांचा सत्कार करण्याचा मान पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर ने मिळवला.
0 टिप्पण्या