रामेगाव येथील सिमेंट रस्त्याच्या कामाच्या संदर्भात कार्यवाही करावी.
प्रहार संघटनेची मागणी.
औसा । प्रतिनिधी
रामेगाव येथील सिमेंट रस्त्याच्या कामाच्या संदर्भात कार्यवाही करावी यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औसा येथे संबंधित अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले. औसा तालुक्यातील रामेगाव या ठिकाणी एका सिमेंट रस्त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. ते काम योग्य प्रकारचे व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व संघटना औसा च्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना तीन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत होतो, व करत आहोत. परंतु त्यांनी ते काम करणाऱ्या व्यक्तीवर व संबंधित अधिकाऱ्यावर
कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसून आलेली नाही. आंदोलनाची कल्पना देऊन सुद्धा संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे प्रहारच्या वतीने जिल्हा परिषद उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औसा यांचे कार्यालयच्या गेटला त्यांचा फोटो ला हार घालून निषेध म्हणून श्राद्ध आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
तसेच औसा तालुक्यामध्ये ह्या कार्यालयामार्फत त्या त्या ग्रामपंचायत कार्यालय हद्दीत सध्या चालू असलेले निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी
करण्याची सुद्धा प्रहार च्या वतीने मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनामध्ये उपस्थित औसा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ आनंदगावकर, प्रहार दिव्यांग संघटना औसा तालुका अध्यक्ष ओम हजारे, तालुका संघटक अंबादास शेळके, तालुका कोषाध्यक्ष रामभाऊ माडजे, तसेच पप्पू भोसले, मच्छिंद्र कांबळे, श्रीकांत चव्हाण, आबासाहेब भुरे, बालाजी गवारे, तानाजी कांबळे, भागवत पाटील, पप्पू भालेराव, प्रदीप पाटील, व्यंकट शेळके, अशोक शेळके, अमोल जाधव, लक्ष्मण जाधव इत्यादी प्रहारसेवक उपस्थित होते.
0 टिप्पण्या