वृद्ध साहित्यिक कलावंताची दोन वर्षापासून हेळसांड सुरू समाज कल्याण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनमानी .
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयामार्फत वृद्ध साहित्यिक व कलावंतांना प्रोत्साहन म्हणून ठराविक मानधन दिल्या जाते लातूर जिल्ह्यातील वृद्ध साहित्य कलावंतांनी 2021- 22 सालापासून आस्थागायत केलेले अर्ज निकाली काढण्यासाठी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती गठित करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन वेळा पत्र देऊनही समिती गठित करण्यात आली नाही पालकमंत्र्याच्या तिसऱ्या पत्रानंतर वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन निवड समिती गठित करण्यात आली परंतु कलावंताचे मानधन मिळण्याचे अर्ज निकाली काढण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत असून लातूर जिल्ह्यातील शेकडो कलावंताची हेळसांड सुरू आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंताचे तीन वर्षापासूनचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी समितीचे सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी समितीचे बैठक घेऊन तीन वर्षाचे प्रस्ताव निकाली काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली परंतु संबंधित विभागाच्या लिपिकाच्या मनमानी कारभारामुळे व लिपिकाचे प्रदेशातील कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्यांना संबंधित लिपिक कसल्याही प्रकारचे सहकार्य करत नाही समितीने व सदस्यांनी वारंवार सदरील लिपिकास सूचना देऊनही संबंधित लिपिक मनमानी कारभार करीत असून समितीच्या सदस्यांना कसल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याने लातूर जिल्ह्यातील शेकडो वृद्ध साहित्यिक व कलावंत निवडीच्या प्रतीक्षेत आहेत. मानधन निवड समितीने पात्र लाभार्थ्यांचे निवड करण्यासाठी मुलाखतीची तारीख मागितली असता संबंधित लिपिक टाळाटाळ करीत असल्याने आणि सदरील लिपिक चार-पाच महिन्यापासून मानधन निवड समितीच्या सभासदांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याने लातूर जिल्हा वृद्ध साहित्य कलावंत मानधन निवड समितीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा लातूर यांच्याकडे तक्रार केली असून या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री गिरीश महाजन, संचालक सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई, आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे, उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर, जिल्हा अधिकारी लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी जि प लातूर यांच्याकडे तक्रारीच्या प्रती निर्गमित केल्या आहेत.
0 टिप्पण्या