औसा नगर परिषद तर्फे बांधण्यात आलेल्या दुकानाचे लिलाव करा व उर्दू घर व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्षा केंद्र, नगरपालिकेस हस्तांतरित करा-मुजम्मील शेख
औसा प्रतिनिधी
औसा येथील नगर परिषद तर्फे बांधण्यात आलेल्या किल्ला मैदानाच्या
बाजुचे दुकानाचे लिलाव करणे व उर्दु घर डॉ. बाबासाहेब आंबेडकर परीक्षा केंद्र, नगर पालिकेस हस्तांतरीत करा अशी मागणी मुजम्मील शेख यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
औसा शहरामध्ये अतिक्रमणाच्या नावावर गोरगरीब जनतेची दुकाने व व्यवसाय बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे औसा शहरातील युवक बेरोजगार झालेले आहेत. औसा नगर पालिकेने मागील २०२१ साली किल्लारी मैदानाच्या बाजुस दुकाने बांधलेली आहेत ते दुकान लिलाव केल्यावर बेरोजगार नागरीकांना व्यवसायाची संधी मिळणार आहे. तसेच औसा नगर पालिकेने तहसीलच्या बाजुस उर्दु घर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र इमारत तयार केलेली आहे. परंतु आजपर्यंत ती इमारते कंत्राटदाराच्याच ताब्यात आहेत.
तरी किल्ला मैदानांचे बाजुचे दुकाने लिलाव (हरास) करण्यात यावे तसेच नगर पालिकेने लवकरात लवकर उर्दु घर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र ही इमारते नगर पालिकेस हस्तांतरीत करुन घ्यावीत व लोकसेवेसाठी देण्यात यावी.अशी मागणी औसा येथील शेख मुजम्मील महंमदसाब यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या