रब्बी हंगामात गहु पिकांचे दोन जातीचे बियाणे देऊन फसवणूक -सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची तक्रार
औसा प्रतिनिधी
रब्बी हंगामात गहू पिकाचें बियाणे दोन जातीचे देऊन फसणुक केली अशी तक्रार एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे
लातूर जिल्ह्यातील औसा येथील सय्यद मुजफ्फर अली इनामदार हे रहिवाशी असून त्यांची औसा येथे इनाम जमीन सर्वे नं. ३५२/ब मध्ये जमीन असून औसा येथील पांडूरंग कृषि सेवा केंद्र औसा येथून दिनांक ०८/११/२०२३ रोजी पावती क्रं. १७४ लॉट नंबर ३११०३ गहू २१८९ जातीचा ४० किलो बियाणे स्वामी कंपनीचे घेतले आहे.
सदरील कंपनीचे बियाणे दोन तीन जातीचे मिक्स असून यापैकी एक जातीचा वाण काढणीस आला आहे. तर दुसऱ्या जातीचे हुरड्यात आहे. तर तिसऱ्या जातीचा वाण आता दुशीत आहे. तीन पद्धतीने पीक उभा असल्यामुळे पाणी देता येत नाही. फवारणी करता येत नाही. मशागत करता येत नाही आणि काढणीही करता येत नाही. यामुळे दीड एकरातील चार महिने खर्च करुन पोसलेल्या गव्हाचे खराब बियाणामुळे नुकसान झाले आहे. सदर दुकानदारास दोन तीन वेळा सुचना करुनही ते पाहणी करण्यास आलेले नाही. त्यामुळे मी तक्रार करीत आहे. माझ्यासह अनेक शेतकऱ्यांचे अशा प्रकारे नुकसान झाले आहेत. अशा कंपनीचे परवाने रद्द करण्यात यावेत व शेतकऱ्यांना होणारे नुकसान थांबवण्यात यावे.
तरी कृषी अधिकारी साहेबांनी माझ्या पिकाची तात्काळ पाहणी करुन तसेच या प्लॉटमधील तात्काळ पाहणी करून तसेच या प्लॉटमधील बियाणांची पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी तक्रार
सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तालुका कृषी अधिकारी यांना 29 फेब्रुवारी 2024 रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या