खरोसा गटातील काॅग्रेसचे तगडे कार्यकर्ते विश्वास काळे यांचा भाजप प्रवेश...
औसा प्रतिनिधी
आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील औसा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीसह विविध पक्ष व संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने भाजप पक्षात प्रवेश करीत असून खरोसा गटातील काॅग्रेसचे तगडे कार्यकर्ते विश्वास काळे यांनीही शनिवारी आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.याप्रसंगी भाजप चे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, औसा शहर अध्यक्ष सुनिल उटगे, संतोष बेंबडे, किल्लारी कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, उन्मेष वागधरे,कार्ला सरपंच श्री काळे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.
खरोसा गटातील काॅग्रेसचे तगडे कार्यकर्ते माजी सरपंच विश्वास काळे यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आहे.काळे यांनी आपल्या जनसंपर्क व राजकिय ताकदीच्या जोरावर पत्नी राजश्री काळे यांना औसा पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळवून दिली होती. त्यांचा मोठा जनसंपर्क असून त्याचा मोठा फायदा या गटात भाजप पक्षाला होणार आहे.एकंदरीत मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकास कामावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात भाजप पक्षात इनकमिंग होताना दिसत आहे.
0 टिप्पण्या