औसा येथे राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धा.

 औसा येथे राज्यस्तरीय भजन  गायन स्पर्धा.



औसा  प्रतिनिधी 


 औसा  येथील  माऊली  प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने  6  आणि 7 एप्रिल रोजी श्री मुक्तेश्वर मंदिरात राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       या स्पर्धा शनिवारी बाल गट आणि रविवारी खुला गट स्पर्धा संपन्न होणार असून बाल गटात प्रथम बक्षीस 5  हजार रुपये तर उत्तेजनार्थ  चौथे बक्षीस  1 हजार रुपये राहणार आहे.

         खुल्या गटातील प्रथम बक्षीस  11 हजार रुपये तर उत्तेजनार्थ चौथे बक्षीस 1  हजार रुपये राहणार आहे.

         दोन्ही  गटातून गुनानुक्रमे आलेल्या  8 विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार असून सुवर्णा पांचाळ, खंडू क्षीरसागर, हभप भास्कर शिंदे, श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ, प्रा. बसवेश्वर गजभारकर, श्रीमंत पांचाळ, गजेंद्र जाधव आणि माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

       या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली प्रतिष्ठान चे अध्यक्ष पं. शिव रूद्र स्वामी, सचिव व्यंकटराव राऊत,  कोषाध्यक्ष हणमंत लोकरे, अड भालचंद्र पाटील, नरसिंग राजे, अविनाश यादव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या