अरहान काझी व सफिया काझी ने आयुष्याच्या पहिला रोजा पूर्ण.
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील शफा नगर येथील अरहान (अब्दुल रहमान)शमशुलहक्क काझी व सफिया समीरऊलहक्क काझी या लहान वयाच्या मुला, मुलींने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधुन 31/03/2024 रविवार रोजी अल्लाह प्रति आपली भक्ती व्यक्त करत आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे.रमजान महीन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये खुप महत्त्वाचा असुन या महिन्यात मुस्लीम बांधव 30 दिवस रोजा ठेवुन विविध धार्मिक विधीद्वारे अल्लाहची पुर्ण श्रध्देने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून अरहान काझी व सफिया काझी या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला आहे.
मानवतेचा व दातृत्वाचा संदेश देणा-या व मुस्लिम बांधवांच्या रमजान रोजांना (उपवास) मंगळवार पासून प्रारंभ झाला होता.इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून,औशातील लहान वयाच्या मुला, मुलींने कडक उन्हाळ्यात जवळपास 14 तासांचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे काझी बिरादार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या