हासेगाव फार्मसीत युवा रंग २०२४ चे उदघाटन सोहळा
औसा (प्रतिनिधी ) खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो खेळणाऱ्या सर्व लोकांना टीम वर्क, समन्वय यासारखे विविध गुण शिकण्यास मदत करतो आणि शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.म्हणून, व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून वेळ घालवणे महत्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी, एक व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. केवळ यामुळेच, वर्षानुवर्षे लोकांची खेळांमध्ये रुची वाढली आहे.असे प्रतिपादन सेवा निवृत्त क्रीडा जिल्हा अधिकारी ,सौ मीरा रायबा तांबडे पाटील यांनी केले.
हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संकुल्नातील लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात स्पोर्ट अँड कल्चरर युवा रंग २०२४ चे उदघाटन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवा निवृत्त क्रीडा जिल्हा अधिकारी ,सौ मीरा रायबा तांबडे पाटील , संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे , संथेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,संस्थेच्या संचालिका लांडगे माधुरी, संचालक नंदकिशोर बावगे , प्राचार्य डॉ . श्यामलीला बावगे(जेवळे ) फिसिओथेरेपी चे प्राचार्य डॉ. मेश्राम वीरेंद्र , मान्यवर मंच्यावर उपस्थित होते .
मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो असे सविस्तर मार्गदर्शन संथेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले.
तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर . लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिटचे विध्यार्थी प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या