औसा विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या जागर ला सुरवात..

 औसा विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या जागर ला सुरवात..



औसा- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनांखाली औसा विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या जागर-मतदार जनजागृती कार्यक्रमास सुरवात झाली २३ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून त्यानुस औसा विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३०७ मतदान केंद्र असून त्यामध्ये औसा तालुक्यातील १०८ गावे व २११ मतदान केंद्र व निलंगा तालुक्यातील ५२ गावे व ९६ मतदान केंद्राचा समावेश आहे.एकूण २,९०,४७१ मतदार असून त्यामध्ये १,५४,७३१ पुरुष,१,३५,७३७ व इतर ३ मतदार आहेत.आगामी लोकसभा  सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारसंघातील मतदाराची नोंदणी वाढावी व मतदानांची टक्केवारी वाढावी म्हणून मतदार जनजागृती करण्यासाठी व लोकशाहीची सुदृढ परंपरा जोपासण्यासाठी मदतरसंघामध्ये स्वीप आराखडा (SVEEP PLAN)मतदार जनजागृती कार्यक्रमास सुरवात करण्यात आली आहे यामध्ये वेग वेगळ्या ८६ ऍक्टिविटीचा समावेश असून आतापासून ते मतदानाच्या दिवशीपर्यंत घेतल्या जाणाऱ्या ऍक्टिविटीचा समावेश आहे त्यामध्ये मतदार संघामध्ये मागील २१ नोव्हेंबर २०२३  पासून गावनिहाय व मतदान केंद्रनिहाय एव्हीएम vvpat जागृती  कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत मतदार संघातील १२० गावापर्यन्त एव्हीएम vvpat द्वारे जनजागृती करण्यात आली आहे आणखीन ४० गावापर्यन्त फेब्रुवारी पर्यंत जनजागृती मोहीम सुरु राहणार आहे.तहसील कार्यालयात येणाऱ्या अभ्यगतासाठी सुद्धा एव्हीएम प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेले आहे येथे दररोज शेकडो लोकाना एव्हीएम प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे मतदार संघातील शाळा ,महाविद्यालये ,बाजाराची ठिकाणे विविध शासकीय कार्यालये या ठिकाणीही एव्हीएम vvpat प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत एव्हीएम vvpat जनजागृती बरोबरच सर्व शाळामध्ये ELC ग्रुप व चुनाव पाठ शाळा याच्या मध्यामधून विविध स्पर्धा उपक्रम घेऊन विद्यार्थी व मतदारामध्ये जनजारुती करण्यात येत आहे यामध्ये रॅलिचे आयोजन,पथनाट्य,रांगोळी,निबंध ,भाषण ,गीतलेखन,घोषवाक्य लेखन रंगभरणत् शुधलेखन इ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे गावस्थरावर तलाठी ,ग्रामसेवक,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका बीएलओ,पोलीस पाटिल यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार नोंदणी व जनजागृती करण्यात येत आहे सर्व शासकिय विभाग व त्यांच्या अधिनिस्त येणारी आस्थापना यांच्या मा ध्यमतुनही विविध जनजागृती उपक्रम घेण्यात येत आहेत याचबरोबर मागील लोकसभा ,विधानसभा निवडणूकी मधे कमी मतदान झालेल्या गावामधे विशेष लक्ष केंद्रित करुन तिथे मतदार नोंदणी वाढविणे लोकामधे जनजागृती करुन त्याना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.सदर मतदार जन जागृती ची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर अविनाश कोरडे ,भरत सूर्यवंशी तहसिलदार औसा,इंद्रजीत गरड नायब तहसीलदार निवडणूक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप चे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड व त्यांची टीम काम करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या