औसा शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी वाया जात आहे ते तात्काळ पाईप लाईन दुरुस्त करा. सय्यद मुजफ्फर अली इनामदार.

 औसा शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी वाया जात आहे ते तात्काळ पाईप लाईन दुरुस्त करा. सय्यद मुजफ्फर अली इनामदार.



औसा प्रतिनिधी  


औसा शहरातील विविध समस्यांवर  पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी 

 एम.आय.एम.च्या वतीने औसा  नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.या निवेदनात मागील ४ ते ५ दिवसापासुन औसा शहरात पाणी पुरवठा होणारा वाल खादी भांडार येथील खराब झाला असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नगर पालीका जनतेला पाणी जपुन वापरण्यास सांगते परंतु नगर पालका स्वतः पाण्याचा अपव्यय करीत आहे. तसेच दुरध्वनीवर संपर्क साधुन प्रशासन डोळेझाक करीत आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर ३ते ४ ठिकाणी पाईप फुटुन रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्याचा नागरीकांना खुप त्रास होत आहे, तसेच फुटलेल्या पाईलाईमध्ये नालीचे घाण पाणी परत जाऊन नागरीकांना नळाद्वारे पुरवठा होऊन नागरीकांचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे.


तरी  नगर पालिका प्रशासनाने शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी वाया जात आहे ते तात्काळ पाईप लाईन दुरुस्त करण्यात यावी. अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा मुख्याधिकारी यांना आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या