कॉम्प्युटर पार्कला बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यामध्ये कॉम्प्युटर पार्कच्या माध्यमातून संगणक क्षेत्रामधील परिवर्तन घडवून आणून हजारो विद्यार्थी घडविणाऱ्या कॉम्प्युटर पार्क या संस्थेला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वतीने 2023 सालाचा बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड देण्यात आला. कॉम्प्युटर पार्कच्या माध्यमातून तालुक्यातील शासकीय निमशासकीय नोकरी असणाऱ्या कर्मचाऱ्यासह अनेक युवक युवतींना संगणकाचे उत्कृष्ट रित्या ज्ञान देण्याचे कार्य करण्यात आले तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा समाजातील युवकांना सारखी योजनेतून संगणकाचे शिक्षण देण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून संगणक शिक्षकासोबतच विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त ही टेस्ट व महामानवाच्या जयंती व इतर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड एम. के.सी.एल. सिनिअर जनरल मॅनेजर श्री अतुल पतोडी सरांच्या हस्ते काशिनाथ सगरे यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अवार्ड चे मानकरी ठरल्याबद्दल कॉम्प्युटर पार्कचे संचालक काशिनाथ सगरे यांचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठवाडा समन्वयक महेश पत्रिके, धम्मदीप जाधव, सुमित शिंदे, अमरजा महाजन, सुनील केवळ, राम जयपाल ठाकूर, अमर उपासे आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या