मुक्तेश्वर विद्यालयात खगोलशास्त्राच्या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न.

 मुक्तेश्वर विद्यालयात खगोलशास्त्राच्या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न.


 औसा प्रतिनिधी

 आयसीआयसीआय बँकेच्या वतीने औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लातूर जिल्ह्यातील पहिल्या खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड राजू दुबे यांच्या शुभहस्ते फीत कापून दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले. यावेळी विभागीय व्यवस्थापक वैभव बन्नागरे, समन्वयक सोमनाथ स्वामी, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, सचिव डॉक्टर बसवराज पटणे, मार्गदर्शक सुभाष आप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सहसचिव प्रभू आप्पा माशाळे, कोषाध्यक्ष उमाकांत मुर्गे, संचालक रविशंकर राचट्टे ,श्रीशैल रेवशेट्टे ,मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे ,आदी मान्यवर उपस्थित होते. आयसीआयसीआय बँकेच्या वतीने आर्थिक व्यवहारा सोबतच सामाजिक कार्याचा भाग म्हणून त्यांच्या राखीव निधीतून शाळेला वाटर प्युरिफायर, वॉटर हार्वेस्टिंग, सोलार प्लांट आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती तसेच अंतराळातील खगोलशास्त्राचा अभ्यास करता यावा सूर्य, चंद्र, मंगळ यासारखे ग्रह तसेच तारा मंडळाची माहिती प्रयोग अत्याधुनिक प्रयोगशाळेतून व्हावी म्हणून लातूर जिल्ह्यात सर्वात प्रथम मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा या शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा आयसीआयसीआय बँकेच्या वतीने उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचा विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा तसेच औसा तालुक्यातील इतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या प्रयोगशाळेचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल अशी प्रतिक्रिया बँकेचे रिजनल हेड राजीव दुबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पुढे बोलताना राजीव दुबे म्हणाले की विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करून आपल्या जीवनाची प्रगती करावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बँकेचे समन्वयक सोमनाथ स्वामी, श्रीमती उज्वला बनकर आणि कुमारी नंदिनी, भोजराज यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मुक्तेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री डोके यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या