ऐतिहासिक औसा फेस्टिवलचा आज भव्य शुभारंभ

 ऐतिहासिक औसा फेस्टिवलचा आज भव्य शुभारंभ 


औसा प्रतिनिधी

 शिव मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक औसा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते 2024 च्या ऐतिहासिक फेस्टिवलचा भव्य शुभारंभ आज दिनांक 28 गुरुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता नगरपरिषद सांस्कृतिक सभागृह औसा येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रूपामाता उद्योग समूहाचे ॲड. वेंकटराव गुंड यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष किरण उटगे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे ,भाजपा शहराध्यक्ष सुनील उटगे ,तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक सुनील रिजीतवाड, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सुभाष जाधव, संतोष चव्हाण, अभिषेक सानप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिव मित्र मंडळाच्या वतीने ऐतिहासिक औसा फेस्टिवलच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून राज्यभरातील नवोदित्य कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऐतिहासिक फेस्टिवल मध्ये वैयक्तिक व समूह नृत्याच्या स्पर्धा घेऊन आकर्षक पारितोषिक व सन्मानपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येते  तरी शिवप्रेमी बांधवांनी व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिव मित्र मंडळ औसा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या