औसा मतदारसंघातील विकास कामासाठी २७ कोटी ७ लक्ष निधी मंजूर..

 औसा मतदारसंघातील विकास कामासाठी २७ कोटी ७ लक्ष निधी मंजूर..


 




औसा शहरातील विकासकामांसाठी १६ कोटी ८५ लक्ष.. 


 खरोसा लेणीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर... 


२० रस्ते कामासाठी ५ कोटी २२ लक्ष रुपये मंजूर.. 





औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात विकास कामे झपाटय़ाने मार्गी लागत असून त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात विविध योजनेतून २७ कोटी ७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून औसा शहरातील ९१ विकासकामांसाठी १६ कोटी ८५ लक्ष तर खरोसा लेणी परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या विकास निधीतून औसा शहरातील मुलभूत विकास कामे केली जाणार असून खरोसा लेणी परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास केला जाईल.तर जिल्हा वार्षिक योजना रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघातील दुरावस्था झालेल्या २० वेगवेगळ्या ग्रामीण मार्गांची व इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी २२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 


           नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष निधी या योजनेअंतर्गत औसा शहरातील ९१ विकासकामांसाठी १६ कोटी ८५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून महात्मा फुले नगर येथील दत्त मंदिराशेजारील खुल्या जागेत सभागृह बांधणे, मातंग समाज स्मशानभूमी शेड व संरक्षण भिंत बांधकाम करणे, भीमनगर येथील स्मशानभूमी शेड व संरक्षण भिंत बांधकाम करणे, बौद्ध नगर येथील स्मशानभूमी शेड व संरक्षण भिंत बांधकाम करणे, गोपाळपूर शेजारील मराठा समाज सभागृह बांधकाम करणे, बसस्थानक ते मुक्तेश्वर मंदिर पर्यंत नाली बांधकाम करणे, हिरेमठ संस्थान येथे सभागृह विस्तारीकरण करणे, वीर हनुमान मंदिर ते भुसार वेस हनुमान मंदिर पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे, तहसील कार्यालय ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, मुक्तेश्वर मंदिर ते एमआयडीसी जोडरस्ता करणे इत्यादी कामांसह ९१ मूलभूत विकासकामे केली जाणार असून यामुळे शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.


                        खरोसा लेणी परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाला खरोसा लेणीच्या रूपात अत्यंत समृद्ध ऐतिहासिक ठेवा लाभला आहे. खरोसा लेणी परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार मागच्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून खरोसा लेणी परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. तर आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून जिल्हा वार्षिक योजना रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघातील दुरावस्था झालेल्या २० वेगवेगळ्या ग्रामीण मार्गांची व इतर जिल्हा मार्गांची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी २२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कार्ला ते कार्ला तांडा रस्ता, कासारसिरसी वाडी जोडरस्ता डांबरीकरण, हासोरी बु उस्तुरी रस्ता, कुमठा ते कुमठा तांडा रस्ता, चिंचोली काजळे ते टाका पाटी रस्ता, हासोरी ते उस्तुरी रस्त्यावरील पुलाचे काम व जोडरस्ता काम, उजनी ते आशीव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, दावतपूर पाटी ते दावतपूर तालुका हद्द रस्ता व जोडरस्ता काम, प्रजिमा-१७ निलंगा ते रामा २४० सिंदखेड गुंजरगा चांदोरी टाकळी इजिमा- ९१ चिलवंतवाडी कासार बालकुंदा रामा-२३७ ते राज्य सिमा रस्ता डांबरीकरण करणे. (चांदोरीवाडी जोडरस्ता), इजिमा-९९ ते भीमा नाईक तांडा ते सेलू येथील शिवरस्ता ते ग्राम या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, याकतपूर सारोळा रस्ता, मदनसुरी ते पिंपळवाडी रस्ता, जमालपुर हिप्परसोगा रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे,येळवट ते तळणी रस्ता पुलाचे व जोडरस्त्याचे काम करणे, चिंचोली (सोन) जोडरस्ता, गरड वस्ती मासुर्डी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे, याकतपूर करजगाव रस्त्यावर याकतपूर गावाजवळ नाली बांधकाम करणे, याकतपूर करजगाव रस्ता सुधारणा करणे, एकंबी तांडा ते एकंबी रस्त्यावरील पुलाचे व जोडरस्त्याचे काम करणे. नागरसोगा गाढवेवाडी तळणी रोड रस्ता पुलाचे व जोडरस्त्याचे काम करणे आदी कामे केली जाणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या