हासेगाव सारख्या ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद- सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील हसेगाव
सारख्या ग्रामीण भागामध्ये वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत संस्थेतील विद्यार्थ्यांनी कला क्रीडा शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अल्पावधीतच यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास पात्र ठरणारी आहे असे प्रतिक्रिया सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी युवा रंग 2024 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश निंबाळकर हे होते पुढे बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की वेताळेश्वर शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात 20 वर्षांमध्ये उल्लेखनीय यशाचे शिखर गाठले आहे येथील संस्था व विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाची परंपरा कायम राखत स्वागत केले अशा प्रकारचे स्वागत इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही असे सांगून सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाले की बावगे परिवाराच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने शिक्षणासोबत समाजकार्याची अतिशय चांगली परंपरा कायम राखली आहे विद्यार्थी प्राध्यापक यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेला न्याक संस्थेचे मानांकन प्राप्त झाले आहे येथील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग यशाचे शिखर गाठत असताना विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आपला नावलौकिक करीत असल्याचे पाहून मला मनस्वी आनंद झाला असेही त्यांनी स्पष्ट केले.
औसा तालुक्यातील हसेगाव येथील
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव द्वारा आयोजित युवा रंग 2024 वार्षिक स्नेहसंमेलन लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगाव येथे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या युवारंग 2024 च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे कॉग्रेस कमिटिचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन भोसले, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी,भाजपाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार, शिवसेनेचे बजरंग दादा जाधव, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, रवी पाटील, ओमप्रकाश झुरळे, बालाजी साळुंके, राजीव कसबे,खाजाभाई शेख,वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, वेताळेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष सौ.जयदेवी बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, लातूर अॉफ फार्मसी चे प्राचार्य सौ.शामलिला बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज अॉफ फिजिओथेरपी प्राचार्य वीरेंद्र मेश्राम, श्रीनिवास बुमरेला प्राचार्य,सौ.योगिता मेतगे आय टी आयचे प्राचार्य, राजीव गांधी पॉलिटेक्नीकल कॉलेज चे प्राचार्य संतोष मेतगे, ज्ञानसागर विद्यालयचे मुख्याध्यापक कालिदास गोरे, प्राचार्य वैरागकर शुभम, लातूर कॉलेज अॉफ नरसिंह चे प्राचार्य सलमान शेख, गुरुनाथ बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक आनंद शेळके,आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व हसेगाव येथील सरपंच उपसरपंच व विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या