आरक्षणासाठी धनगर समाजाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू.

 आरक्षणासाठी धनगर समाजाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू.



औसा प्रतिनिधी 

..

हजारो धनगर समाज बांधव आरक्षणासाठी एकटवले.


औसा: केंद्र सरकारच्या आरक्षण मध्ये धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचे आरक्षणाची नोंद असताना राज्य सरकार कडून याबाबत कार्यवाही केली जात नाही अनेकवेळा आंदोलने, मोर्चा काढूनही सरकारला जाग येत नसल्याने अखेर औसा येथील तहसील कार्यालया समोर सोमवार दि.१२ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल धनगर समाज बांधवांनी शहरात पायी पदयात्रा काढून '' यळकोट-यळकोट-जय मल्हार घोष करीत परिसर दणाणून सोडला होता पदयात्रे नंतर आमरण उपोषण सुरू करण्यात आले यावेळी समाजाचे नितीन बंडगर पाटील यांच्या सह शेकडो समाज बांधव यात सहभागी झाले आहेत.

यावेळी उपोषण स्थळी सर्वात अगोदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून उपोषणाची सुरवात करण्यात आली आहे तात्काळ आरक्षण अंमलबजावणी करावी यासह

धनगर समाजाची एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी,महाराष्ट्रातील धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या बांधावरील दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे,औसा - निलंगा टी-पाँईट या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक बांधण्यात यावे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्यश्लोक महाराणी अहील्यादेवी होळकर यांच्या नावाने किमान ३०० विद्यार्थ्यांची सोय होईल असे सर्व सोयीनीयुक्त व निशुल्क वसतिगृह मंजूर करून त्याचे ताबडतोब भुमीपुजन करण्यात यावे,सध्याचा काळ हा स्पर्धा परिक्षेचा काळ आहे, सामान्य मेंढपाळ धनगर कुटूंबातील कितीतरी विद्यार्थी आज स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी पुणे, मुंबई किंवा दिल्लीला राहून तयारी करणे अर्थिक परिस्थितीमुळे शक्त होत नाही. त्याकरिता राज्य शासनाने बार्टी व सारथी यासारखे आरती या नावाने (अहिल्यादेवी होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्थेची उभारणी करावी,महाराणी अहील्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचाच्या वतीने मागील सात वर्षापासून धनगर समाजाच्या अनुसूचीत जमातीच्या अमंलबजावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आलेली आहे सदर याचीकेचा खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी करण्यात आली आहे या पायी पदयात्रा सह उपोषणात सकल धनगर समाज बांधव सहभागी झाला आहे.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या