उमर पंजेशा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड.
औसा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर द्वारा आयोजित, स्वराज्य सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला.व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याअनुषंगाने या कार्यक्रमा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या सूचनेनुसार सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून आपला वावर, तळागाळातील माणसांशी जोडलेली नाड , जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याची हातोटी नागरिकांना भेडसावणाऱ्या समाजाच्या विरोधात वेळोवेळी करण्यात आलेल्या आंदोलनातील आपला उत्स्फूर्त सहभाग या अशा अनेक बाबीची दखल घेत उमर गुलाम हुसेन पंजेशा यांची 13 फेब्रुवारी मंगळवार रोजी सुलेमान फंक्शन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक औसा शहराध्यक्षपदी निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख, मेहराज शेख, वकील इनामदार, समीर शेख,दत्तु अण्णा कोळपे, फहाद अरब, सौ. किर्ती ताई कांबळे,फराज शेख,साजीद काझी, महंमद युनुस चौधरी,शाकेर सय्यद, जुबेर शेख,वाजीद शेख,आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या