आम आदमी पार्टी लातूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान वाचन करून बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

 आम आदमी पार्टी लातूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान वाचन करून  बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.





औसा प्रतिनिधी 


लातूर.

आम आदमी पार्टी लातूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच मनुस्मृतीचे दहन करून संविधान वाचन करून बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी मागील नऊ वर्षांत भारतीय जनता पार्टी व आर एस एस यांनी हा देश मनुस्मृतीच्या मार्गावर नेण्याचा घात घातलेला आहे.देशात ठिकठिकाणी अल्पसंख्याक तसेच दलीतावर अत्याचार होत आहे,आणि हे सर्व अत्याचार कश्यासाठी तर त्यांना तथागतीत या भारताचे जे संविधान आहे हे संविधान बदल करुन त्यांना तथागतीत हिंदू राष्ट्र त्यांना या भारतामध्ये अणायचे आहे. हे आम्हाला कदापी मान्य नाही.हे संविधान आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे आणि  ते सर्व समावेशक आहे.हे संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि मनुस्मृतीचा विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी शुक्रवार रोजी लातूर येथील भारताचे संविधान लिहिलेल्या  सत्यमेव जयते स्तंभा समोर आम्ही आज येथे आलेले आहोत आणि येथे आम आदमी पार्टीच्या वतीने मनुस्मृतीचा दहन करुन तसेच संविधानचे वाचन करून आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली व प्रजासत्ताक दिन साजरा केला.असे आप चे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे आनंदा कामगुंडा, सौ. अनुराधा मुनगंटी, आकाश मोठेराव,

 शिवलिंग गुजर,आकाश कांबळे,इम्रान पटेल,दगडू माने, नागनाथ मोरे,शफीक चौधरी,

 अस्लम तांबोळी, फिरोज शेख, मोहंमद रफी, विश्वंभर कांबळे, रत्नदीप म्हस्के, राजेश मुनगंटी,विवेक वाघमारे, नुसरत शेख, हरी गोटेकर,  आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या