संघटन कौशल्य महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच राजकीय पक्षामध्ये आहे असे आगळेवेगळे एक व्यक्तिमत्त्व अमर खानापुरे यांच्यामध्ये आहे-अमित देशमुख

 संघटन कौशल्य महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच  राजकीय पक्षामध्ये आहे असे आगळेवेगळे एक व्यक्तिमत्त्व अमर खानापुरे यांच्यामध्ये आहे-अमित देशमुख 



 औसा प्रतिनिधी 


   भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यांनी अनेक स्तरावर पक्षामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे आणि अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडल्या आहेत.ते औशाचे सुपुत्र आहेत

आणि नेहमी औशासाठी काहीतरी आपण केले पाहिजे हा सातत्याने त्यांनी विचार जोपासला आहे.गेल्या अनेक दशकांपासूनच माझं त्यांचा परिचय आहे.आदरणीय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे कार्यरत असताना सोनिया गांधी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा राहून जेव्हा काम पाहत होते त्या काळापासून त्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रीय आहेत .आणि आज येथे आल्यानंतर खरंच मला मनापासून त्यांचं कौतुक करावेसे वाटते.त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल   माहिती होती आणि आपल्या सगळ्यांनाच आम्हाला असं वाटलं होतं की त्यांचा संघटन कौशल्य फक्त कॉग्रेस पक्षा पुरतं मर्यादित आहे.पण इथे आल्यानंतर असं वाटलं त्यांचा संघटन कौशल्य महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच राजकीय पक्षामध्ये आहे असे आगळेवेगळे  एक व्यक्तीमत्व अमर खानापुरे यांच्यामध्ये आहे हे मला आवर्जून नमूद केले पाहिजे.

असे प्रतिपादन औसा येथे शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी औसा जनता को -अॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटिच्या श्री कुमार स्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित 

   उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी  माजी मंत्री अमित देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे होते. या कार्यक्रम प्रसंगी वीरशैव समाजाचे सुभाषप्पा मुक्ता यांनी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेचे पहिले खाते काढल्याने त्यांना पासबुक देण्यात आले तर उद्योजक महेश बीदादा यांनी मुदत ठेव केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना मुदत ठेवीचे प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर अँड दिपक सूळ,माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, विजयकुमार मिटकरी, मारूती महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, विद्यमान चेअरमन श्याम भोसले,व्हाईस चेअरमन सचिन पाटील, कॉग्रेसचे प्रदेश सचिव बस्वराज धाराशीवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे,, तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, अँड मंजूषा हजारे,अंगद कांबळे, सचीन मिटकरी, संजय उजळांबे,बजरंग दादा जाधव,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातून अनेक मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या