सकल मुस्लिम समाजाच्या वतीने लातूर येथे आमरण उपोषण..

 सकल मुस्लिम समाजाच्या वतीने लातूर येथे आमरण उपोषण..



औसा प्रतिनिधी 

लातूर.

सकल मुस्लिम समाज महाराष्ट्र राज्यात  मोठ्या प्रमाणात असून ते शैक्षणिक दृष्ट्या  मागासलेले असल्या कारणाने त्यांना आरक्षण व संरक्षण द्यावे यासाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने  मुस्लिम समाजाला माननीय उच्च न्यायालयाने 5 % शैक्षणिक आरक्षण दिले आहे त्याचा विधानसभेमध्ये कायदा बनवून अंमलबजावणी करा.मुस्लिम समाजातील व्यक्तीची  गोरक्षणाच्या नावावर मॉबलिंचींग जमावाकडून  हत्या करण्यात येत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला अॅटरोसिटी कायदा बनवून संरक्षण द्यावे.मुस्लिम समाजाच्या  नागरिकांचे मॉबलिंचींग / गोरक्षणाच्या नावावर  हत्या करण्यात आली त्यांच्या परिवारातील व्यक्तीस एक कोटी आर्थिक मदत व शासकीय नोकरी  देण्यात यावी . वरील सर्व मागण्याची तात्काळ अंमलबजावणी करुन सकल मुस्लिम समाजाला आरक्षण व संरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी सकल मुस्लिम समाज 26 जानेवारी शुक्रवार रोजी गांधी चौक लातूर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. यावेळी  या आमरण उपोषणास सकल मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या