औसा जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे शनिवारी भव्य उद्घाटन.

 औसा जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे शनिवारी भव्य उद्घाटन.


 औसा प्रतिनिधी 

औसा शहर आणि तालुक्यातील ठेवीदार बांधवांच्या सेवेत औसा जनता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नवीन पतसंस्थेच्या भव्य उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते आणि धाराशिव लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि माजी आमदार दिनकरराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शिवसेनेचे संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेषराव पाटील, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, सुनील मिटकरी, महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गिरीश पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे नूतन चेअरमन श्याम भोसले आणि व्हाईस चेअरमन सचिन पाटील तसेच औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी औसा जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हितचिंतक व निमंत्रित बांधवांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चेअरमन अमर खानापुरे, व्हाईस चेअरमन अविनाश पवार, सचिव किशोर पारोडकर, सहसचिव ऍड दीपक राठोड, कोषाध्यक्ष निळकंठ कुठे, व्यवस्थापक बालाजी पाटील संचालक प्रशांत भोसले, रविशंकर भावले, ऍड मंजुषा हजारे, कैलास कापसे, सौ. नीता धनंजय पाटील आणि आलिम तांबोळी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या