श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त औसा शहरात राम भक्तांच्या आनंदाला उधान.

 श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त औसा शहरात राम भक्तांच्या आनंदाला उधान.



औसा प्रतिनिधी 


संपूर्ण देशवासीयांच्या अस्मितेच्या आणि श्रद्धा भक्तीचा प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा पुण्याच्या सोहळ्यानिमित्त औसा शहर आणि तालुक्यात राम भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक गावात शोभायात्रा काढून आनंदोत्सव साजरा केला.औसा शहरांमध्ये श्रीराम मंदिर येथे आमदार अभिमन्यू पवार, नाथ संस्थानचे सद्गुरु श्रीरंग महाराज औसेकर, हिरेमठ संस्थांचे पिठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज आणि नागेश्वर मठ संस्थानचे महंत राजेंद्र गिरी महाराज यांच्या उपस्थितीत महिला भजनी मंडळ व हजारो राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करून उत्सवाला सुरुवात झाली.या उत्सवामध्ये प्रभू रामचंद्राच्या भव्य मूर्तीची शोभायात्रेतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचे सजीव देखावे करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक किल्ला मैदानावरून संभाजीनगर, जलालशाही चौक, गांधी चौक, जुमामस्जिद चौक मार्गे या शोभा यात्रेचा लातूरवेस हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. लातूर वेस हनुमान मंदिरा च्या समोरील मैदानात भव्य मंडप टाकून आयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली होती.हजारो राम भक्तांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याचा आनंद घेतला. याच कार्यक्रमांमध्ये  कारसेवा केलेल्या कार सेवकांचा आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची मूर्ती, शाल, टोपी आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.अभुतपूर्व शोभा यात्रेमध्ये विविध धर्मगुरू प्रवचनकार कीर्तनकार, वारकरी, महिला भजनी मंडळ यांनी जय सियाराम आणि श्रीराम जय राम जय जय राम जय घोष करीत तरुणा तरुणाईने नृत्याविष्कार करीत आनंद साजरा केला तर महिलांनी फुगड्या खेळून आपला आनंद द्विगुणित केला.दुपारी तीन ते पाच पर्यंत कापड गल्ली येथे राम भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था श्रीराम जन्मोत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. सकाळी सात वाजता संभाजीनगर येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून ऍप्रोच रोड चौकापर्यंत भव्य मोटार सायकल रॅली आणि फटाक्याची आतिष बाजी करीत जयश्रीराम चा जयघोष करून तरुणांनी या कार्यक्रमांमध्ये हर्ष उल्हास आणि सहभाग घेतला. औसा शहर आणि तालुक्यामध्ये श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत आनंदाने साजरा करण्यामध्ये रामभक्त मग्न होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या