औसा वाहन चालक संघटनेच्या अध्यक्षपदी अमजद शेख यांची निवड.
.
औसा प्रतिनिधी
औसा येथील शासकीय विश्रामगृहात
औसा तालुका वाहन चालक संघटनेची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 14 जानेवारी रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह औसा येथे वाहन चालक संघटनेची बैठक घेण्यात आली.या सदर बैठकित नवीन चालक वाहक संघटनेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली, वाहन चालक संघटनाच्या बैठकीचा प्रस्ताविक पाशा शेख यांनी केले. व तसेच मार्गदर्शक सल्लागार एडवोकेट मजहर शेख यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत वाहन चालक संघटनेच्या अध्यक्षपदी अमजद शेख यांची निवड करण्यात आली. व तसेच संघटनाचे उपाध्यक्षपदी राजभाऊ बनसोडे यांची निवड,सचिवपदी इस्माईल उर्फ हाजी इमाम शेख यांची निवड,कोषाध्यक्षपदी महादेव देशमाने यांची निवड,सहसचिवपदी पाशा शेख यांची निवड,
सह कोषाध्यक्षपदी मनशाद शेख यांची निवड व तसेच
सल्लागार /मार्गदर्शकपदी अँड मजहर शेख यांची निवड,
समन्वयकपदी जाफर खोजन (सय्यद)यांची निवड या बैठकीत करण्यात आली,या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आभार हरिभाऊ शिंदे यांनी मानले. यावेळी वाहन चालक संघनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या