विधानसभा असु द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणतेही निवडणूका पूर्णपणे लढविण्याची शपथ. आश्विन नलबले

 विधानसभा असु द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणतेही निवडणूका पूर्णपणे लढविण्याची शपथ. आश्विन नलबले


 

औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यात आम आदमी पक्षाला खुप जोमाने वाढविण्यासाठी मागच्या एक महिन्यापासून आम आदमी पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान हे औसा तालुक्यात जोमाने चालू होते.या सदस्य नोंदणी दरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या लोकांनी आम आदमी पक्षात सामील होण्याची इच्छा दर्शविली अशा सगळ्यांना सामिल करुन घेण्यासाठी व त्यांना पद वाटप करण्यासाठी आजची हि बैठक जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह औसा येथे घेण्यात आली.यावेळी या बैठकीत आम आदमी पक्षाला लातूर जिल्ह्यामध्ये औसा, लातूर व इतर सर्व तालुक्यामध्ये खुप जोमाने वाढवून आगामी काळातील लोकसभा वगळता विधानसभा असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणतेही निवडणूका असु द्या या पूर्णपणे लढविण्याची आज शपथ आम आदमी पार्टी घेत आहे. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी या बैठकीत सांगितले.यावेळी या बैठकीत तालुकाध्यक्ष दगडु वसंत मोरे, मिडिया प्रमुख मुख्तार मणियार,नरसिंह गोविंद रायफले, परमेश्वर अशोक मिटकरी , महात्मा भरत उबाळे, दस्तगीर महेताब शेख,भागवत राजेंद्र जगताप, नागनाथ पांडुरंग मोरे, रामचंद्र सुर्यवंशी, इम्रान पठाण,गौस पाशा मोमीन, मुजम्मील शेख, सय्यद जमीर,मिनाज दस्तगीर, अलीम बागवान आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या