औसा तहसिल कार्यालयावर शेतकरी शेतमजूर निराधारांचा महा आक्रोश मोर्चा.

 औसा तहसिल कार्यालयावर शेतकरी शेतमजूर निराधारांचा महा आक्रोश मोर्चा.




औसा प्रतिनिधी 


शेतकरी शेतमजूर निराधारांचा विविध मागण्यासाठी औसा येथे महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्याचे सविस्तर वृत्त असे शेतकऱ्यांना सोयाबीनला 9000 हजार रुपये भाव द्या.

शंभर टक्के पिकविमा द्या.चालू बाकी करण्यासाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक करण्याची अट रद्द करा.

नियमित कर्ज फेडण्या-या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्या.कांदा निर्यात बंदी उठवा,व निराधारांना दर महा 3 हजार रुपये मानधन द्या.अशा विविध मागण्यासाठी शेतकरी शेतमजूर निराधारांचा वतीने दिनांक 15 जानेवारी सोमवारी दुपारी औसा येथील किल्ला मैदानावरून तहसिल कार्यालयावर महा आक्रोश मोर्चा काढून औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना  निवेदन देण्यात आले.यावेळी या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जेष्ठ नेते सत्तार पटेल,अरुणदादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे,जिजाजी जगताप, मोहिनी कांबळे, श्याम जाधव, प्रकाश घोरपडे,सौ.प्रतिभा विनोद मिसाळ,सौ.कल्पना मिसाळ, हणमंत सुरवसे, बालाजी जाधव, व्यंकट चलवाड, सुरेश सुर्यवंशी,इमाम सय्यद,भरत पाटील,अंकुश गायकवाड,दिलीप लवटे, सौदागर वगरे,राजेंद्र मोरे, राजीव कसबे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या