*औशात मराठा-मुसलीम बंधुभावाचे दर्शन
*औसा मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा योद्धा व आरक्षणासाठी लढा देणारे मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत व 10 स्टाॅल द्वारे फराळ व खिचडी व व पाणी वाटप
औसा प्रतिनिधी
औसा शहरात मराठा योद्धा मा.श्री जरंगे पाटील यांचे रॅली द्वारे शहरात आगमन होताच किल्ला परिसर, जलालशाही मज्जिद समोर, जामा मस्जिद समोर, बस स्टॅन्ड, मुक्तेश्वर रोड पंचायत समिती समोर, अप्रोच रोड इत्यादी ठिकाणी स्टॉल द्वारे व मंडप उभारून मुस्लिम समाजाच्या वतीने श्री जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी मुस्लिम युवकांनी फराळ, चिप्स, बिस्किट, खिचडी, केळी व पाण्याचे पाऊच सह मराठा समाजातील बांधवांची सेवा करण्याची संधी साधली. याप्रसंगी श्री जरांगे पाटील यांनीही गाडीच्या खाली येऊन स्टेजच्या वरती जाऊन मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्काराचा मनपुर्वक स्वीकार केला तसेच या प्रसंगी आभारी व्यक्त केले व भविष्यात मराठा-मुस्लिम मुस्लिम बंधुभाव भविष्यात वृद्धिंगत व्हावा अशी मनोकामना ही व्यक्त केली. मागील काळात ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातूनही मुस्लिम समुदायाने औसा शहरात ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे आयोजन करून मराठा बांधवांना आपल्या प्रवासातील थकवा दूर करण्यासाठी फराळाची व पाण्याची सेवा केली होती. तसेच हायवेच्या अप्रोच रोड भागातील ट्रॅफिकचेही उत्तम नियोजन मुस्लिम युवकांनी याप्रसंगी केले व सुरळीत वाहतुकीस मोकळीक दिली.
0 टिप्पण्या