वातावरण बदलामुळे रबी हंगामातील पिके धोक्यात
शेतकर्यांचे अर्थिक नियोजन बिघडणार
औसा प्रतिनिधी
या वर्षी तालूक्यात पाऊस उशिरा सुरू झाला .त्याचे
प्रमाणे ही गेल्या वर्षी पेक्षा खूपच कमी झाला आहे.परीणामी शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर झालेला आहे.सोयाबिण,तुर,मुग, उडीद,या सारखे नगदी पिकांचे उत्पादनात बरीच घट झाली आहे.उत्पादन झालेल्या सोयाबीन पिकाचे बाजारपेठेत शेतकरी मंडळींना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तसेच त्याच्या जवळ असलेल्या पशुधनाच्या चा-याचा व पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.तसेच रबी हंगामात तरी परतीच्या पाऊस पडेल अशी सर्वसामान्य शेतकरी मंडळाची आशा होती .पण याही मोसमात निसर्गाच्या लहरीपणा चा तडाखा बसला आहे.याचा परीणाम थेट ज्वारी, गहू,करडी, हरभरा, या पिकांची पेरणी ही पावसा अभावी बर्याच शेतकरी मंडळाची पेरणी झाली नाही. असेच उत्पादन घटल्याने अन्नधान्य वर मोठा परिणाम होईल अशी भीती शेतकरी मंडळींना वाटत आहे.पुढील वर्षी रब्बी हंगामातील उत्पादन होईपर्यंत दिवस कसे काढायचे हा प्रश्न आवासून उभाराहत आहे.
तसेच उपवर झालेल्या मुला, मुलींचे लग्न कसे करावे.खर्चा साठी लागणारे पैसे कोठून आणायचे . शाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्याचा खर्च ही कसा भागवायचा कसा या प्रश्नाने शेतकरी पुरता मेटा कुटीला येत आहे.
वातावरणातील बदलामुळे ज्यांची पेरणी झाली आहे .त्यात ज्वारी, गहू, हरभरा,करडी या पिकांची पेरणी केली खरी पण अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतातील कोवळी पिके पिवळी पडून वाया गेल्याने दुबारा पेरणी करण्याची वेळ बळीराजा वर आली पण नडगमगता पेरणी केली पण कोवळ्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो आहे.ज्वारी पिकावर लष्करी आळी चा प्रादुर्भाव दिसून येतो आहे तर हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भावा चा परिणाम झालेला दिसत आहे.यामुळे रबी हंगामातील उत्पादन घटन्याची चिन्ह दिसत आहेत.याचा परीणाम थेट जेवणाच्या ताटातील ज्वारी ची भाकरी व गव्हाच्या चपात्या ही महाग होणार याची चाहूल सर्वसामान्याना लागली आहे.
0 टिप्पण्या