मुक्तेश्वर विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..

 मुक्तेश्वर विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..





औसा/प्रतिनिधी :


औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्ता मिरकले पाटील तर मार्गदर्शक म्हणून औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, आगारप्रमुख अजय गायकवाड, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी


रामदास इंगवले, ग्राहक पंचायतीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा श्रीमती कौशल्या मंदाडे, तालुकाध्यक्ष मोहन माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन.जी.माळी,


मुक्तेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. जलसकरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे, राजकुमार हालकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार भरत सूर्यवंशी, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात


आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना दत्तात्रय मिरकले पाटील यांनी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन केले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आले तर ग्राहक पंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.


या कार्यक्रमास महसूलसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, मुक्तेश्वर विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या