औसा शहरात अतिक्रमण मोहीम धुमधडाक्यात सुरू नागरिक धास्तावले
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील गायरान जागेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून शहरातील वाढते अतिक्रमणे काढण्याची मोहीम धूम धडाका सध्या सुरू असून अतिक्रमण मोहीम गतिमान झाल्याने नागरिक धास्तावले आहेत पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालयापासून लातूर वेस, हनुमान मंदिर ते खादी कार्यालयापर्यंत रस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. दुसऱ्या टप्प्यांमध्ये मुक्तेश्वर रोडवरील अतिक्रमण काढण्यात आली व त्यानंतर आठ दिवसांपूर्वी कोर्टासमोरील नगरपालिकेच्या आरक्षण क्रमांक 53 मध्ये व्यापारी संकुल बांधण्यासाठी सर्वे नंबर 88 मध्ये असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोरील तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या लाकडी मशीन असलेल्या गायरान जागेतील अतिक्रमण काढण्यात आले आहे कोर्टाच्या निकालानुसार गायरान जागेतील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असल्याने अतिक्रमण करणाऱ्या नागरिकात घबराट पसरली आहे.
0 टिप्पण्या