शेतकरी व शेतमजुरांच्या शंभर गावातून दिडशे किलोमीटर पायी दिंडी..
औसा प्रतिनिधी
औसा : सोयाबीनला नऊ हजार रुपये दर
मिळावा, शंभर टक्के पीक विमा तातडीने वाटप करा, चालू बाकी करण्यासाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरायची बंधनकारक अट रद्द करा, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, कांदा निर्यात बंदी उठवा, निराधार, अपंग, विधवा यांना तीन हजार रुपये अनुदान द्यावे, पक्षीय झेंडे बाजूला ठेवून निराधार, शेतकरी, शेतमजूर म्हणून एकत्र येऊ असा एल्गार करीत दि १ जानेवारीपासून तीन तालुक्यातील १०० गावांमध्ये १५० किलोमीटर पायी दिंडी करण्याचा निर्णय निराधार संघर्ष समितीचे राजेंद्र मोरे व राजू कसबे घेतला असून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उजनी येथून ही पायी दिंडी सर्वच गावात जाणार आहे.
१५ जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली औसा शहरात दि १५ जानेवारी रोजी वरील प्रश्नांसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार असून पायी दिंडी नंतर तालुक्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर, निराधार या मोर्चात सहभागी होणार असून किल्ला मैदानावरून थेट तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे व त्यानंतर सभा होणार असल्याचे राजेंद्र मोरे व राजू कसबे यांनी सांगितले.
शेतकरी व इतर घटकांचा विविध मागणीबाबत
केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.
सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळावा यासाठी
सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व शेतकरी नेते तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दहा वर्षांपूर्वी नेतृत्व पायी दिंडी यात्रा काढून तत्कालीन सरकारच्या विरोधात अदोलन केले होते. त्यावेळी सोयाबीनला अडीच हजार रुपये भाव होता. नंतर सोयाबीन आठ हजार रुपये पर्यंत गेले. मात्र ज्यांनी सोयाबीन दरासाठी आंदोलन केले तेच आज केंद्रात व राज्यात सत्तेत आहेत मग सोयाबीनचा दर पाच हजाराच्या आत का आला? विरोधात असताना सोयाबीन, पीकविमा तसेच शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करून कळवळा येतो मग सत्तेत असताना याच मंडळींच्या हाताला लकवा पडला आहे का? शेतकरी विरोधी धोरण आणि सत्तेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या या मंडळींना जागे करण्यासाठी विविध मागण्यांसाठी तीन तालुक्यात पायी दिंडीचा निर्णय घेतला आहे. ही या पायी दिंडीचा शुभारंभ उजनी येथून गणेशनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन व याच गावात १ जानेवारी रोजी मशाल यात्रा करून शेतकरी, शेतमजूर, निराधार यांना एकजूट करून ही पायी दिंडी निघणार आहे. औसा तालुक्यातील सर्वच गावाबरोबर निलंगा तालुक्यातून लातूर येथे सिद्धेश्वर मंदिर दर्शन घेऊन दि १४ जानेवारी रोजी औसा येथील बालाजी मंदिरात याचा समारोप करण्यात येणार आहे. दरम्यान वरील तिन्ही तालुक्यातील विविध गावातून ही पायी दिंडी जाणार असून याच सर्वच धार्मिक स्थळांना दर्शन व सभा होणार आहेत.
0 टिप्पण्या