*नवीन यु टर्न व ट्रॅफिक सिग्नल साठी जनतेतून मागणी*
औसा प्रतिनिधी
औसा शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी यु टर्न सोडणे आवशयक आहे व 'शहरातील चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवणे' तसेच 'मोठ्या प्रमाणावर स्पीड ब्रेकर गतिरोधक करणे' संबंधी नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
औसा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 जात आहे व त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु सध्या असे निदर्शनास आले आहे की यु टर्न फक्त दोनच ठिकाणी सोडण्यात आलेले आहे शहरातून जात असलेल्या पटेल चौक ते एमआयडीसी रस्त्यापर्यंतचे अंतर साधारण दोन किमीचे असून यामध्ये फक्त दोनच ठिकाणी यू टर्न सोडण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना शहरातील दैनंदिन कामे करण्याकरिता साधारण कमीत कमी एक किमीचे अंतर पार करून प्रत्येक वेळी यावे लागत आहे त्यामुळे शहरातील लोकांची दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे तसेच यामुळे वाहनांचे इंधनाची नुकसान होत आहे म्हणजेच जनतेचा वेळ व पैसा यामुळे वाया जात आहे तसेच देशाच्या इंधनाची ही यामुळे नुकसान होत आहे सदरील रस्त्यावरती आणि ठिकाणी यु टर्न करणे आवश्यक आहे व शहराच्या दोन्ही बाजूस नागरिकांना दैनंदिन कामा काजाकरिता आवश्यक अशी दवाखाने, धार्मिक स्थळे, शाळा, दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी साधारण एक किमी चे अंतर जावे लागत आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याच्या मधोमध डिव्हाइडर बसविले असून त्याचे फेंसिंग तटरक्षक चे कामी जोरात चालू आहे त्यामुळे लोकांना रस्ता ही ओलांडता येणे शक्य नाही शहरात आल्यानंतर वाहनाची वेग मर्यादा ही आपोआप कमी होणार आहे कारण कोणतेही शहर लागल्यास वाहन चालक आपली वेगमार्यादा कमीच ठेवत असतो त्यामुळे जागोजागी यू टर्न ठेवलास नागरिकांचीही ती सोयीचं होणार आहे.
औसा शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग हा शहराच्या नवीन हद्दवाढीच्या भाग असून येथे शहरीकरणाचा वेग झपाट्याने आहे ग्रामीण भागातून शहरी भागात लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होऊन नवीन भागात येत आहे त्यामुळे या दाट वस्तीच्या भागात रस्त्यावरती जागोजागी यु टर्न सोडणे आवश्यक आहे. औसा शहरातील जुना गाव नकाशा मधील शिवरस्ते हे या हायवेमधून जात आहेत व ज्या ठिकाणी हे शिवरस्ते जात आहे त्या ठिकाणी सुद्धा रस्ता ओलांडण्यासाठी यु टर्न सोडणे आवश्यक आहे परंतु असे करण्यात आलेले नाही, यामध्ये जुना सारोळा रस्ता, जुना करजगाव रस्ता, जुना सेलू रस्ता इत्यादींचा समावेश आहे जे की अधिकृत औसा गाव नकाशावर असताना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ते बघण्यात आलेली नाही तसेच शहरातील चौकामध्ये वाहतूक सुरळीत होण्याकरिता ट्रॅफिक सिग्नल ही बसवण्यात येणे गरजेचे आहे जेणेकरून शहरातील चौकातील वाहतूक सुरळीत होईल व अपघाताचे प्रमाण ही नगण्य राहील व नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.
तसेच शहरातून जात असलेल्या या दोन किमीच्या रस्त्यावरती गतिरोधक एकही करण्यात आली नाही राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाप्रमाणे गतिरोधक सर्व ठिकाणी करण्यात येत असताना ते औसा ठिकाणी दिसत नाहीत.
0 टिप्पण्या