धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ची अंमलबजावणी करा- सकल धनगर समाजाची मागणी

 धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ची अंमलबजावणी करा-

 सकल धनगर समाजाची मागणी 


औसा प्रतिनिधी 

भारतीय घटनेनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यापासून वंचित आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू होते हे उपोषण सुरू असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारचे प्रतिनिधी उपोषण स्थळी येऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्यासह व शासकीय सदस्यांची समिती नेमून पन्नास दिवसात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची आश्वासन दिले होते जे सरकारने धनगर समाजाच्या उपोषणकर्त्या नेत्यांना दिलेले आश्वासनाचा कालावधी पूर्ण झाला असून अद्याप धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली नाही तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.या मागणीसाठी सकल धनगर समाज औसा तालुका यांच्या वतीने तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी औसा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हार आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन निवेदन सादर केले. या निवेदनावर सर्वश्री

राम कांबळे, कृष्णा सुरवसे,प्रशांत काळे, महादेव कांबळे, अखिलेश काळे, संभाजी सुरवसे,प्रशांत कांबळे, प्रदीप कांबळे,तेजस कांबळे,बळीराम सुरवसे, विशाल रायभोगे,राम घोडके, गणेश रायभोगे, महादेव सुरवसे,भरत शेडंगे, ज्ञानेश्वर घायाळ,दिपक काळे,रवी सुरवसे, मच्छिंद्र चेंडके, महादेव कात्रे, सुखदेव सुरवसे, महादेव काळे, गोंवीद कारे,किरण कांबळे, विकास लांडगे, शिवाजी काळे, तानाजी होळकर, कृष्णा कळवंडे, अर्जुन कळवंडे, आत्माराम मिरकले,आर एस सुरवसे, अशोक सुरवसे, उद्धव काळे,वैभव कोरे,भागवत गायकवाड, आकाश बनसोडे, औदुंबर दुधभाते,रवी घोडके,दिपक बंडगर, मुरलीधर सोनटक्के,अजय शेळके आदिच्या स्वाक्ष-या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या