लातूर जिल्ह्यातील सर्वच महसुल महामंडळाचा दुष्काळी महसूल मंडळांमध्ये समावेश करुन अग्रीम पिकविम्याची 25 टक्के रक्कम सरसगट खात्यात जमा करा -मनसे ची मागणी

 लातूर जिल्ह्यातील सर्वच महसुल महामंडळाचा दुष्काळी महसूल मंडळांमध्ये समावेश करुन अग्रीम पिकविम्याची 25 टक्के रक्कम सरसगट खात्यात जमा करा -मनसे ची मागणी


औसा प्रतिनिधी 

 उजनी मंडळासह जिल्हयातील सर्वच महसुल मंडळाचा समावेश दुष्काळी महसुल मंडळामध्ये करुन अग्रीम पिकविम्याची २५ टक्के रक्कम सरसगट शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ अदा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसीलच्या प्रवेश व्दारास टाळे ठोको अंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना मागणी केली आहे.त्याचे सविस्तर वृत्त असे उजनी मंडळासह जिल्हयातील सर्वच महसुल मंडळाचा समावेश दुष्काळी महसुल मंडळामध्ये करुन आग्रीम पिक विम्याची २५ टक्के रक्कम शेतक-याच्या खात्यावर येत्या दहा ! दिवसात अदा करावी.

 तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती असताना तसेच जुन ते  सप्टेंबर या काळात सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस तसेच पावसाचा २१ दिवसापेक्षाही जास्त खंड असल्याची नोंद शासन दरबारी असूनही तालुक्यातील उजनी महसुल मंडळ मंत्रिमंडळ उपसमीतीच्या दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषत करण्यात आलेल्या यादीतून वगळण्यात आले आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने खरीपाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने या भागाची जाहीर केलेली पैसेवारी (आणेवारी) देखील ४७ पैसे पेक्षा कमी आहे. जिल्हयात सर्वात कमी पाऊस हा या उजनी महसुल मंडळात (३१७ मि.मि.) झाल्याची अधिकृत नोंद शासनाच्या महसुल विभागाकडील दप्तरी आहे. एकंदरीत उजनी हे मंडळ दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या निकषात बसत असताना देखील हे मंडळ शासनाने जाहीर केलेल्या यादीतून वगळलले दिसून येत आहे. तेव्हा उजनी महसुल मंडळाचा समावेश दुष्काळ महसुल मंडळामध्ये करावा व या भागातील शेतक-यांना जमीन महसुलात सुट, सरकारी कर्जाचे पुनर्गठन अथवा कर्जमाफी, शेतीची निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगीती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट/बिल माफ, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथितता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे इत्यादी सवलती तात्काळ लागू कराव्यात त्याचबरोबर २५ टक्के अग्रीम पीक विम्याची रक्कम जिल्हयातील सरसगट शेतक-याच्या खात्यावर तात्काळ अदा करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा लातूरच्या वतीने दि.०३ डिसेंबर २०२३ नंतर औसा तहसीलच्या प्रवेशव्दारास टाळे ठोकुन तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशी मागणी मनसेच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना  23 नोव्हेंबर  गुरुवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, महेश बनसोडे, गोंवीद चव्हाण, विकास लांडगे, अमोल थोरात, रघुवीर ढोक, स्वप्नील पाटील, धनराज गीरी, मुकेश देशमाने, जीवन जंगाले, तानाजी गरड, सतीश जंगाले,सुरज उस्तुरे,अजय पांढरे, प्रशांत सेलूकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या