औशात दोन दिवसीय इज्तेमा संपन्न..
मनुष्याच्या यशस्वी जीवनाचे मुख्य स्त्रोतच इमान व नमाज आहे..
मुफ्ती असलमसाब याचे उपदेश
औसा प्रतिनिधी
जगातील सर्व शक्ती एकत्र केली तरीही ईश्वरी शक्तीचा मुकाबला करु शकत नाही .ईश्वरच सर्वव्यापी व सर्वस्वी असल्याची खात्री होणे म्हणजेच इमान.ज्याचा जीवनात इमान व नमाज नाही तो मुसलमान होऊ शकत नाही . मनुष्याच्या यशस्वी जीवनाचे मुख्य स्त्रोतच इमान व नमाज आहे.यातच मानव जातीची कामयाबी आहे.असे मत मुफ्ती असलमसाब यांनी मगरिबच्या नमाजनंतर व्यक्त केले.
औसा येथे सुरू असलेल्या इज्तेमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने त्यानंतर अल्लाहचे नामस्मरण, कुरआन झाली. पठण, बयाण, नमाज आणि सायंकाळी असरनंतर इज्तेमाही शादीया संपन्न झाल्या. हजारो लोकांकरिता जेवनासह, राहणे, बाजार, पार्किंग व्यवस्था आणि प्रवाशांना रहदारीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शेकडो स्वयंसेवकांची फौज तैनात होती. या इज्तेमाची सांगता सामुदायिक दुआने झाली. यात १० हजारांपेक्षा जास्त मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता. यावेळी मानव कल्याणासाठी दुआ केली. यात मुफ्ती मुसलीहोद्दीन साब यांनी ईश्वराला साकडे घालत आम्हाला प्रत्येक संकटातून वाचविण्याची विनवणी केली. आम्ही कमजोर, गुन्हेगार आहोत, तुझ्या क्रोधाचा सामना करु शकत नाही, तुझ्या प्रिय प्रेषितांचे अनुयायी आहोत, तूच आम्हाला तारु शकतोस, आमच्या मनात इमान व नमाज कायम करा, देशाचे प्रत्येक संकटातून रक्षण करण्याची त्यांनी दुआ केली. इज्तेमाच्या शेवटच्या दिवशी असरच्या नमाजनंतर मुफ्ती मुसलीहोद्दीन साब बीडवाले यांनी सामुदायिक विवाहाबाबत उपदेश केला. यावेळी त्यांनी लग्नविधी साधे,सोफ्या इस्लामिक पध्दतीने झाले पाहिजे. प्रेषितांनी जो मार्ग (सुन्नते) विवाहाकरिता सांगितल्या, त्यांचा अवलंब केला तर वैवाहिक जीवन सुखी राहील. विवाहात वायफाय खर्च नको, हुंड्यासह इतर वस्तुंच्या नावाखाली वधू पाल्यांची पिळवणूक याला इस्लाममध्ये स्थान नाही. तो गुन्हा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या