भादा ते शिवली रस्ता "असून अडचण नसून खोळंबा"....

 भादा ते शिवली रस्ता "असून अडचण नसून खोळंबा"....




शेतकरी एकजुटीने बंद असलेला रस्ता मुरूम टाकून केला सुरू.... एक वर्षानंतर तीन ट्रॅक्टर एक जेसीबीने केला सुखद प्रवास...

औसा प्रतिनिधी 

औसा:तालुक्यातील भादा ते शिवली हा रस्ता गेल्या एक वर्षापासून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता आज रोजी पर्यंत बंदच होता देशांमध्ये कोठेही रस्ता काम सुरू झाले तर त्या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून डायवर्षण दिले जाते.रस्त्याच्या बाजूला कितीही किमतीची जमीन असली तरीही त्या जमिनीमधून पुढे जाण्यासाठी शेतकरी आणि शिवली,वरवडा ,बिरवली, धाराशिव या शहराकडे जाण्यासाठी त्या रस्त्यावरून अनेक प्रवासी वाहने आणि नागरिकांना सुलभता निर्माण करून दिली जाते परंतु या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आपल्या शेती कामासाठी जाण्यासाठी एक इंच ही जमीन  तात्पुरती दिली जात नाही.याचा प्रत्यय या रस्त्यावर आल्यानंतर प्रत्येक नागरिकांना आल्याशिवाय राहत नाही आणि त्या रस्त्यावरून प्रवास करताना किंवा सदरील ठिकाणची परिस्थिती पाहिली असता त्या व्यक्तीस  बेंबीच्या देठापासून त्या ठिकाणी उभारलेला व्यक्ती हा रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांना शिव्या घातल्याशिवाय पुढे जाणार नाहीच अशी परिस्थिती सदरील रस्त्याची गेल्या एक वर्षापासून निर्माण झालेली/केलेली आहे.ती पूर्ण होण्याकरिता स्थानिक प्रशासन,स्थानिक पुढारी, सदररील रस्त्याचे गुत्तेदार, सदरील रस्त्यावरील प्रशासकीय अधिकारी, तालुक्याचे तहसीलदार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या परिसराचे लातूर ग्रामीणचे आमदार औसा तालुक्याचे आमदार ,लातूर जिल्ह्याचे खासदार या सर्वाकडे सदरील रस्त्याबाबत शेतकरी नागरिक यांची टीम गेल्या एक वर्षापासून वेळोवेळी गेलेली आहे.. प्रत्येक कार्यालय जिल्हाधिकारी आमदार लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन पुढारी यांच्याकडे चकरा मारून सदरील भागातील शेतकरी हे शेवटी अन्याय किती सहन करणार आणि का?म्हणून स्वतःच्या हिमतीवर येऊन थांबले असून त्यांच्या स्वतःच्या पर्यायानेच हा रस्ता सुरू करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत... सदरील रस्ता काम बंद करण्याकरिता कोर्टाकडून स्टे ऑर्डर आणल्याची चर्चा असून कोर्टानेही रस्ता अडविण्यासाठी स्टे दिलेला आहे काय तर त्या शेतकऱ्याची जमीन रस्त्यामध्ये जाऊ नये,शेतीचे नुकसान होऊ नये किंवा सदरील शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये याकरिता कोर्टाने ते दिल्याची माहिती आणि चर्चा भादा गावचे माजी उपसरपंच बालाजी एम शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत केली असून सदरील रस्ता हा राज्यमार्गाला जोडणारा आणि दोन गावासाठी जाणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यावरूनच दैनंदिन शेतीकडे वाहतूक करणारे शेकडो शेतकरी दैनंदिन हालाखीच्या जीवनातून जात आहेत तर या रस्त्यावर किरकोळ ते गंभीर जखमी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि या ठिकाणी अनेक शेतकरी किरकोळ ते गंभीर जखमी झाले ही आहेत.यामुळे सदरील भागातील शेतकरी हे आता अंत नका पाहू!!? या परिस्थितीवर येऊन थांबले  असून यापुढे शेतकरी आपल्यावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही सहनशीलतेचा बांध फुटत असल्याचे प्रत्यक्ष चित्र दिसत असून स्वतःचा रस्ता स्वतःच करणार या प्रमुख भूमिकेत येऊन ठेपली असून आज रोजी पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला एकही शब्द चांगला किंवा वाईट न वापरणारे आज सदरील परिस्थिती पाहून रस्ता काम सुरू करण्यासाठी उद्द्विग्न होण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे... याचा अनुभव शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सदरील रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने तो रस्ता सुरू करण्याकरिता सदरील भागातील शेतकरी एकत्रित येऊन त्याने ट्रॅक्टर आणि जेसीबी द्वारे तो रस्ता जाणे येण्यासाठी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित शेतकऱ्याने जेसीबी वाले ट्रॅक्टर वाल्यांना त्या ठिकाणी काम करू नये किंवा काम केले तर याचे गंभीर परिणाम होतील.याबाबत वारंवार फोन करून सांगितले परंतु लोकप्रतिनिधीच्या विनंतीवरून सदरील वाहनधारकाने शेतकऱ्याची अडचण पाहून तो रस्ता जाणे येणे करिता व्यवस्थित करू द्यावा अशी विनंती केल्याने तो रस्ता काम करण्यात आले असल्याची चर्चा आहे.परंतु सदरील रस्ता काम हे अडविण्याकरिता कोणते शासन प्रशासन परवानगी देते किंवा न्यायालय ही शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता देणार नाहीत काय? किंवा न्यायालयाचा अवमान होईल असे कोणताही शेतकरी किंवा प्रशासकीय अधिकारी कार्य करणार नाही?ही बाब निश्चित खरी असली तरी सदरील रस्ता कामांमध्ये येणारा पूल हा त्या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे परंतु दोन्ही बाजूने जर मुरूम टाकला तर त्या ठिकाणाहून वाहन व्यवस्थित रित्या जाईल आणि तो रस्ता प्रवासासाठी सुलभ मार्ग होईल याकरिता कोणाच्याही बांधच्या मध्ये न जाता चालू रस्त्यावरच शेतकरी त्या पुलाच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला असता सदरील काम थांबविण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकरी हे सदरील शेतकऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि शासनाने आम्हाला सदरील शेतकऱ्यांची दोन्ही बाजूच्या कोणाचेही नुकसान होऊ नये याची दक्षता घेत शेतकऱ्यांना पुढे जाणे येण्यासाठी व्यवस्थित रस्ता करून द्यावा अशी मागणी विविध प्रशासकीय अधिकारी आणि कार्यालयांमध्ये जाऊन वेळोवेळी केलेली आहे परंतु या शेतकऱ्याच्या मागणीकडे कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्यामुळे हा रस्ता तसाच पेंडिंग मध्ये पडून आहे तो रस्ता व्यवस्थित करण्यासाठी सदरेल शेतकऱ्याचे मनोबल आणि भावना समजून घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे परंतु हे काम करण्याचा योग कोणत्याही अधिकाऱ्यांना का येत नाही ही बाब भादेकरांसाठी निश्चितच निंदनीय पण दयनीय आहे... अशी चर्चा सध्या तालुका भर सुरू आहे...


*गेल्या एक वर्षापासून शेती काम करण्यासाठी घेऊन जाणारे वाहन यामध्ये पाचशे ते हजार रुपये ज्यादा वाहन धारकाकडून घेतले जात आहेत.केवळ रस्ता नसल्याने दूरवरून यावे लागते यामुळे पैसे अधिक घेतले जातात..यामुळे आपण कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये किंवा वाहीत रानामध्ये/अडवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये न जाता सुरू असलेला पारंपारिक वहीवाटेचा रस्ता त्यावर मुरूम टाकून रस्ता काम करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु तोही रस्ता अडविण्याचे पाप संबंधित शेतकरी करीत आहेत.यामुळे कोणाचेही म्हणणे न ऐकता आपण केवळ शेतकरी आणि या भागातील प्रवास करणारे प्रवासी यांच्याकरिता हा रस्ता कोणाच्याही बांधामध्ये न जाता सुरळीत कसा होईल असा प्रयत्न केला जाईल.असे या भागातील शेतकरी दयानंद एम पाटील,मनमत बी पाटील ,विश्वनाथ बी पाटील,महादेव टी पाटील, इसाक सी शेख,आदीसह इतर शेतकऱ्यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया दिली...*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या