*दुष्काळात शेतकर्यांना आणि गरजूंना साथ हाच युवकांचा संकल्प.*
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस,लातूर चा युवक संकल्प मेळावा लातूर येथे गरजूंना मोफत अन्नधान्य वितरण करत संपन्न.
काल दि. 13/10/2026 रोजी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा प्रा डॉ अफसर शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा श्री निखील दादा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा श्री दयानंद सुरवसे, बांधकाम सभापती मा श्री ज्ञानेश्वर बिरादार, समाज कल्याण सभापती मा श्री उत्तमराव माने, जी प सदस्य मा डॉ श्री दीपक सोमवंशी, जी प सदस्य मा श्री उमेश उमापुरे,जिल्हा कार्याध्यक्ष मा प्रा श्री अंकुश नाडे,कार्यालयीन युवक प्रदेश सरचिटणीस मा श्री अमरजी पाटील व इतर सर्व सन्माननीय जी प सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सेलेब्रेशन रिसॉर्ट,लातूर येथे उत्साह व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा ना श्री बाबासाहेब पाटील साहेब यांनी कॉल द्वारे मार्गदर्शन केले आणि यामुळे उपस्थित युवकांमध्ये उत्साह संचारलेला पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजक युवक जिल्हाध्यक्ष मा महेश बिरादार यांनी युवक संघटनेच्या कार्याचा संपूर्ण आढावा देऊन युवकांच्या विविध मागण्या तसेच जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याची विनंती केली.
तसेच युवक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्याबद्दल युवक प्रदेशाध्यक्ष निखील ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रा डॉ अफसर शेख व इतरांनी संयोजकांचे अभिनंदन केले.
महेश बिरादार यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील युवक संघटना अतिशय चांगले आणि भरीव काम करत असून त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन युवक प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
तसेच या प्रसंगी जिल्हा व तालुका स्तरावरील विविध नियुक्त्या देखील देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष मा श्री रवी धुमाळ व कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन जिल्हा संघटक जनक बिरादार व आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद बाजगिरे यांनी मानले.

0 टिप्पण्या