पालघरच्या डॉ. शीला पाईकराव यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

 पालघरच्या डॉ. शीला पाईकराव यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार



१ सप्टेंबरला लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान


लातूर, दि. ३१ : ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पालघर येथील सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य व एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. शीला राजकुमार पाईकराव (गोडबोले) यांना सन २०२६ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.


प्रा. व्ही. आर. दाडगे लायब्ररी फाउंडेशन, लातूर या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने सन २०२३ पासून ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल पुरस्काराने गौरविण्यात येते. ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करणे तसेच ग्रंथपालांमध्ये व्यावसायिक गुणवत्ता वाढविणे हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.


पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात ‘ग्रंथ आपल्या दारी’, ‘शाळेपर्यंत ग्रंथालय’, ‘ह्युमन लायब्ररी’ तसेच कोविड काळात रुग्णालयांमध्ये राबविलेल्या वाचन उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ. पाईकराव यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. यासोबतच महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या संगणकीकरणातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


त्यांच्या या सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांची सन २०२६ च्या राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे पालघरच्या शैक्षणिक व ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या