औसा तालुक्यात पुन्हा NBS अजीम विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी
एसएससी परीक्षा 2026 मध्ये अदिती किरनाळे तालुक्यात प्रथम ; विद्यालयाचा शंभर टक्के यशाचा झेंडा कायम
औसा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) 2026 च्या निकालात NBS अजीम माध्यमिक विद्यालय, औसा यांनी पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल यशपरंपरेला साजेशी दमदार कामगिरी नोंदवली आहे. यंदाच्या निकालात विद्यालयाची विद्यार्थिनी कु. किरनाळे अदिती गोरख हिने तब्बल 99.00 टक्के गुण मिळवत औसा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण औसा तालुक्याचा गौरव वाढला आहे.
विद्यालयाच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यश दिसून आले असून 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 आहे. विशेष प्राविण्य मिळवणारे 52 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 89 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक : कु. किरनाळे अदिती गोरख — 99.00%
द्वितीय क्रमांक : जहागीरदार अफान खुर्शीद — 96.80%
तृतीय क्रमांक : कु. पठाण आदिबा सत्तार — 94.80%
उर्दू माध्यमातील गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक : कु. शेख इकरामाहीन खाजा — 91.40%
द्वितीय क्रमांक :
कु. शेख जोहरा सल्लाउद्दीन — 85.80%
कु. काझी सफूरा युनूस — 85.80%
तृतीय क्रमांक : कु. मोमीन सिद्रा गौसपाशा — 84.60%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह विद्यालयात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. डॉ. अफसर नवाबोद्दीन शेख साहेब, संस्था प्रतिनिधी मा. सुलेमान भैय्या शेख, संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. शेख निजामोद्दीन इसाकोद्दीन साहेब, संस्था निरीक्षक सय्यद हकीम सर, पर्यवेक्षक शेख टी. एम., मेटे एस. व्ही., डॉ. सिद्दीकी एम. के., परीक्षा प्रमुख सय्यद अबरार सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे NBS अजीम माध्यमिक विद्यालयाने औसा तालुक्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून यंदाचाही निकाल त्या परंपरेला साजेसाच ठरला आहे.

0 टिप्पण्या