औसा येथे समाधान शिबिर संपन्न
औसा, प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान प्रशासनाच्या उद्देशाने औसा येथे शुक्रवारी समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
शिबिराचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, शोभा पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम आडसूळ, अप्पर तहसीलदार रामेश्वर स्वामी, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, नायब तहसीलदार सुरेश पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या समाधान शिबिरामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर दाखला, अल्पभूधारक दाखला आदी विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांची प्रशासकीय कामे जलद व सुलभ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांनीही शिबिराच्या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.









0 टिप्पण्या