*शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्रीबाई आज जगाची शिलेदार*
औसा प्रतिनिधी दि. 14 मे 2026 रोजी औसा शहरातील MKCL चे अधिकृत केंद्र च्या माध्यमातून सर्व केंद्रामध्ये कंप्यूटर शिकत असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी " व्हय मी सावित्रीबाई फुले" या विषयावर नाटिका सादर करण्यात आले.शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार
"व्हय मी सावित्रीबाई' हे ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित एक अत्यंत गाजलेले मराठी एकपात्री नाटक आहे हे नाटक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर स्त्री शिक्षणासाठीच्या त्यांच्या बलिदानावर आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकते
ज्या दोन कलाकारांनी ही कला सादर केली त्या *शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने*. या दोन्ही कलाकाराने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा सर्व संघर्षमय प्रवास यांच्या नाटिकेमधून सादर केला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठवाडा विभागाचे समन्वयक श्री महेशजी पत्रिके , श्री मुक्तेश्वर विद्यालय येथील श्री माशाळकर सर, महेश्वरी कंप्युटर संचालक श्री सुमित शिंदे स, कॉम्प्युटर पार्कचे संचालक श्री काशिनाथ सगरे स, फ्रेंड्स कम्प्युटरचे संचालक धम्मदीप जाधव ,
अमर कम्प्युटरचे संचालक अमर उपासे ,
साई कम्प्युटर संचालक सुनील केवलराम आणि अमेय कम्प्युटरच्या संचालिका.सौं अमरजा महाजन, वर्षा सगरे मॅडम एमकेसीएल प्रतिनिधी दीपाली बालगीर ,ऋतुजा सगरे, इग्नेट सेंटरचे शेख सर,कृष्णा सूर्यवंशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नजीरशेख यांनी तर कार्यक्रमाचे आभार सुमित शिंदे यांनी मानले या कार्यक्रमाला औसा तालुक्यातील दहावी बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


0 टिप्पण्या