औसा एमआयएम अध्यक्षपदी सय्यद मुज्जफरअली इनामदार यांची निवड; सत्कार सोहळा उत्साहात

 औसा एमआयएम अध्यक्षपदी सय्यद मुज्जफरअली इनामदार यांची निवड; सत्कार सोहळा उत्साहात







सामाजिक कार्याचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा वर्षाव




औसा शहरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुज्जफरअली इनामदार यांची एमआयएम पक्षाच्या औसा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून इनामदार यांचे अभिनंदन केले.


या सत्कार सोहळ्यात अँड. समियोद्दीन पटेल, डॉ. वहीद कुरेशी, हबीब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनी इनामदार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत,  त्यांचा शाल व पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


आपल्या मनोगतात सय्यद मुज्जफरअली इनामदार यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले. शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नव्या अध्यक्षांचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या